- *एरंडोल येथे छत्रपती शिवाजी मित्र मंडळातर्फे पत्रकारांचा सन्मान….!*
एरंडोल – येथे छत्रपती शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.मनोज नथ्थू पाटील व त्यांच्या मित्र परिवारातर्फे ७ जानेवारी २०२५ रोजी शाल,बुके ,पेन व डायरी देऊन पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार बी.एस.चौधरी हे होते.प्रारंभी प्रा.मनोज पाटील,आल्हाद जोशी,चंद्रभान पाटील,कमरअली सय्यद, प्रा.शरद महाजन,रतिलाल पाटील व पत्रकारांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण होऊन दिपप्रज्वलन करण्यात आले.
पत्रकार हा समाजाचा जागल्या म्हणून सतत कार्य करीत असतो.एवढेच नव्हे तर समाजाला योग्य दिशा दाखवणारे दिपस्तंभ असतात.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.एरंडोल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पत्रकारांशी वेळोवेळी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा व सुचना जाणून घेण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन प्रा.मनोज पाटील यांनी करून एरंडोल येथे पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे त्याकरिता आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या सहकार्याने पत्रकार भवन उभारण्याचे आश्वासित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा माजी उपनगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भानुदास आरखे यांनी केले.तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक नितीन चौधरी यांनी केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळा पाटील,माजी नगरसेवक नितीन चौधरी हे मान्यवर उपस्थित होते
पत्रकार कैलास महाजन,राजधर महाजन, प्रमोद चौधरी,देविदास सोनवणे, कुंदन ठाकूर, पंकज महाजन,विजय पाटील, नितीन ठक्कर, सुधीर शिरसाट,उमेश महाजन, तुषार शिंपी, स्वप्निल बोरसे,दिनेश चव्हाण आदी पत्रकारांचा सत्कारार्थी मध्ये समावेश होता.
तसेच शाम जाधव,पंकज पाटील,अतुल मराठे,भानुदास आरखे,उल्हास लोहार, प्रा. मयुर जाधव,सुशिल पाटील,प्रशांत निळे,निखिल पवार,गोपाल पाटील,अनिल आरखे,संजय कुंभार,सागर गोसावी,भुषण चौधरी,चेतन मराठे,चंद्रशेखर वाघ,रोहीत राजपुत,राज पाटील,मयुर मराठे,अनिल मराठे,अनिल भोई,नागराज नाव्ही, ऋषिकेश पाटील, दिलीप सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
