*सरकारी शिव रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर रित्या नाला तयार करून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या इसमाची तहसीलदारांकडे तक्रार…!*
*सरकारी शिव रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर रित्या नाला तयार करून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या इसमाची तहसीलदारांकडे तक्रार…!* एरंडोल – तालुक्यातील मौजे नांदखुर्द बु. व फरकांडे या दोन्ही गावांना जोडणारा सरकारी शिव रस्ता आहे. विजय रामकृष्ण पाटील यांच्या गट नंबर २०१ ला लागून जवळपास १०० वर्षांपूर्वीचा साधारण ४ ते ५ किलोमीटर लांबीचा नैसर्गिक नाला आहे.