-
आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून एरंडोल आगारात ५ नवीन एसटी बसेसचे लोकार्पण…

एरंडोल प्रतिनिधी – येथे एसटी आगाराला सुसज्ज ५ नवीन एसटी बसेस मिळाल्या आहेत. गुरुवारी रात्री या बसेस घेऊन चालक एरंडोल रवाना झाले असून, आज पहाटे या बसेस एरंडोल आगारात दाखल झाल्या. या बसेस मिळण्यासाठी आमदार अमोलदादा पाटील यांनी परिवहन मंत्री प्रतापरावजी सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच एसटी प्रशासनाकडूनही नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याला यश आले आहे. आज या बसेसचे आमदार अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण करीत, बसेस प्रवाशी सेवेत दाखल करण्यात आल्या.
आमदार अमोलदादा पाटील यांनी एरंडोल बस आगारातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी अलिकडेच एसटी अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली होती. आगाराच्या मागणीनुसार आमदार अमोलदादा पाटील यांनी परिवहन मंत्री प्रतापरावजी सरनाईक यांच्याकडे २० बसेस उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करून एरंडोल आगाराला नवीन बसेस लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. एसटी प्रशासनानेही वरिष्ठ सतरावर नवीन बसेसची मागणी केली होती. तसेच आमदार अमोलदादा पाटील यांनी परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला, त्यानुसार या आगाराला नवीन पाच बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस आणण्यासाठी एरंडोल आगारातून चालक व वाहक सेंट्रल वर्कशॉप, दापोडी येथे पाठविण्यात आले होते. ते या बसेस घेऊन गुरूवारी रात्री एरंडोलला येण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. शुक्रवारी पहाटे या बसेस एरंडोल आगारात दाखल झाल्या. आमदार अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते या नवीन बसेसचा लोकार्पण आज करण्यात आले.प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, धरणगांव बाजार समिती मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, धरणगांव बाजार समिती उपसभापती किरणदादा पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, मा.नगरसेवक चिंतामण पाटील, शहरप्रमुख अतुल मराठे, टोळी सरपंंच बाळासाहेब पाटील, बाम्हणे येथील मुकुंदा पाटील यांचेसह एरंडोल आगारातील अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
या बसेस बीएस ६ तंत्रज्ञान प्रणालीच्या असून अशोक लेलैण्ड कंपनी बनावटीच्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मार्गे परिवहन महामंडळाच्या स्व मालकीच्या आहेत. एरंडोल तालुक्यासह पारोळा तालुक्यात सद्यस्थितीत गैरसोय होत असलेल्या फेऱ्यांचा ठिकाणी व प्रवाशांची जादा मागणीनुसार ह्या बसेसचे नियोजन करावे अशा सूचना एरंडोल आगार व्यवस्थापक यांना यावेळी दिल्या.
येत्या काळात उर्वरित बसेस उपलब्ध करून प्रवाशांची होत असलेली गैरसोय कशी दूर करता येईल यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. यात एरंडोल आगाराचे नुतनीकरण, पारोळा बसस्थानकाला आगाराचा दर्जा, कासोदा येथे बसस्थानक यांसह प्रवाशांच्या सोयीचा अन्य मागण्यादेखील लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आ.अमोलदादा पाटील यांनी सांगितले.
आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून एरंडोल आगारात ५ नवीन एसटी बसेसचे लोकार्पण… एरंडोल – एरंडोल एसटी
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
