-
*एरंडोल तालुक्यात ७ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूका,तहसीलदार गोपाळ पाटील यांची माहिती……..!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील वनकोठे,खेडगांव,वरखेडी,नानखुर्द खुर्द,नानखुर्द बु., खडके बु.व पिंपळकोठा प्र.चा.या ग्रामपंचायतींमधील सर्व पक्ष प्रमुख पदाधिकारी व नागरिकांना कळविण्यात येते की मा.राज्य निवडणूक आयोग यांच्या १७ मार्च २०२६ च्या पत्रानुसार ग्रामपंचायतींमधील सदस्य,थेट सरपंच यांचे निधन,राजीनामा,अनहर्ता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपरिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे.७ मार्च २०२६ च्या सुचनेनुसार ७ ग्रामपंचायतींमधील १३ जागांसाठी पोटनिवडणूका घेण्यात येत असून नामनिर्देशन पत्र ७ एप्रिल २०२६ ( मंगळवार ) ते १३ एप्रिल २०२६ ( सोमवार) वेळ सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत शनिवार व रविवार वगळून स्विकारण्यात येणार आहे.दरम्यान ७ एप्रिल या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले नाही.अशी माहिती तहसीलदार गोपाळ पाटील यांनी दिली आहे.
*एरंडोल तालुक्यात ७ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूका,तहसीलदार गोपाळ पाटील यांची माहिती……..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*
August 9, 2026
10:19 am
