- *एरंडोल नगरपालिकेची ९ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार……!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे नगरपालिकेच्या नगरसेवकांची पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १२ वाजता न.पा.सभागृहात करण्यात आले आहे.सदर सर्व साधारण सभेचे पिठासन अधिकारी म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर हे कामकाज पाहणार आहेत.अशी माहिती मुख्याधिकारी अमोल बागुल व प्रशासकीय अधिकारी हितेश जोगी यांनी दिली आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेच्या सुनिता रूपेश माळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.तसेच स्वीकृत सदस्य पदासाठी शिंदे सेनेचे डॉ. नरेंद्र पाटील व भाजपातर्फे योगेश देवरे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
नगरपालिकेत भाजपा व शिंदे शिवसेना युतीचे वर्चस्व आहे.निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या २३ असून २ स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.
*एरंडोल नगरपालिकेची ९ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार……!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*
August 9, 2026
10:19 am
*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा*
July 30, 2026
8:36 pm
