- *एरंडोल येथे शिवजयंती उत्साहात साजरी…..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौक, हायवे चौफुली, ओमनगर या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याच्या आयोजन करण्यात आले.ठिकठिकाणी रस्त्यांवर भगव्या पताका लावून सजावट करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी,अमित पाटील,आर.ए.शिंदे,अभिजीत पाटील,प्रा.मनोज पाटील,उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, शालिग्राम गायकवाड, विजय महाजन, रमेश महाजन,एस.टी.पाटील,रवि जाधव, अरूण माळी, सुनील पाटील,अजय पाटील, डॉ. सुरेश पाटील,आर.डी.पाटील,के.डी.पाटील, डॉ.कैलास पाटील, नगरसेवक मयुर महाजन, विलास पाटील,सुभाष पवार, राकेश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
हायवे चौफुलीवर नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर व विजय महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आर.ए.शिंदे, अभिजित पाटील,आर.डी.पाटील आदी उपस्थित होते.
ओमनगर येथे अनेक मान्यवरांनी भेट देऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.यावेळी अतुल पाटील,गजानन पाटील, सचिन पाटील, राकेश पाटील, समाधान पाटील, राहुल ठाकूर, प्रदीप राजपूत, राजेश पाटील,हरिश चौधरी,अभय पाटील,पवन महाले,सोनू पाटील, विवेक पाटील, जगदीश पाटील,राजू चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
*एरंडोल येथे शिवजयंती उत्साहात साजरी…..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान*
September 8, 2026
8:21 pm
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
