एरंडोल विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी…?
एरंडोल- एरंडोल विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची पायाला भिंगरी बांधून मतदार संघात आपली बाजू भक्कम करण्यासाठी कठीण परिश्रम घेत असून मतदार संघातील मतदार राजाच्या भेटी घेत आहेत आम्हीच मतदार संघाचे संभाव्य उमेदवार असून आगामी विधानसभा मतदारसंघात इच्छुक असून एरंडोल पारोळा मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधू अशी ग्वाही उमेदवाराकडून मतदार राजांना दिली जात आहे…
एरंडोल पारोळा व गिरड अमरदे गट ह्या मतदार संघाची रचना 2009 यावर्षी नव्याने झाली असून सदर मतदार संघावर गेल्या तीन पंचवार्षिकच्या काळात माजी आमदार डॉ.सतीश पाटील व विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांनी आपली पकड कायम ठेवलेली आहे परंतु यावेळी या विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित उमेदवारांसमोर नवख्या उमेदवारांनी आवाहन उभे केले आहे तरी आगामी काळात एरंडोल पारोळा मतदार संघ हा पुनश्च प्रस्थापित उमेदवारांना संधी देतो की परिवर्तन घडवितो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात पडलेली फुट आणि त्यानंतर बदललेले राजकीय समीकरणे यामुळे यंदाची निवडणूक ही अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे तरी सदर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार चिमणराव पाटील व त्यांचे सुपुत्र अमोल चिमणराव पाटील हे शिंदे गटाकडून इच्छुक आहेत माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील शरद पवार गट तर डॉ हर्षल माने व माजी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन हे उ.बा.ठा कडून इच्छुक आहेत तर अजित पवार गटाकडून डॉ. संभाजी राजे पाटील तालुकाध्यक्ष अमित पाटील यांनी देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर भारतीय जनता पार्टी तर्फे माजी खासदार ए.टी.नाना पाटील व माजी नगर अध्यक्ष गोविंद शिरोडे हे इच्छुक आहेत तर भगवान महाजन सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावणार असल्याचे दिसून येत आहे.
युती आघाड्याच्या राजकारणात कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळते यावर आगामी निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसते
एरंडोल विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी…?
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm
