-
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पद्मालय येथे भाविकांची गर्दी…..
-
एरंडोल प्रतिनिधी – येथील पद्मालय हे गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथे डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती एकाच ठिकाणी आहेत, जे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर एरंडोल शहरापासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे. पद्मालय हे नाव “पद्म” आणि “आलय” या दोन शब्दांपासून बनले आहे, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ कमळाचे घर असा होतो. ..
या देवस्थानला श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक भाविकांनी सकाळपासून दर्शन घेण्यासाठी गर्दी करत होते तसेच या ठिकाणी काही भाविक भक्तांन कडून भंडाऱ्याचे देखील आयोजन केले जात असते तर श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून हिंदू धर्मात मानला जातो त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी पद्मालय येथे गणेश भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी पद्मालय येथे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तगण हे जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात.
विशेष हे निसर्गरम्य वातावरण हिरव्यागार डोंगर रांगा संपूर्ण दगडी बांधणीतील पद्मालय मंदिर अतिशय भव्य व सुंदर आहे मंदिर गर्भगृहात गजाननाच्या दोन मूर्ती आहेत.
त्या स्वयंभू मानल्या जातात कमळाच्या फुलांनी भरलेला तलाव त्या ठिकाणी भरणारी यात्रा ही भक्तांना आकर्षित करत असते श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने आणि नित्यनेमाने येथे भाविक हजेरी लावत असतात…..
