*स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त एरंडोल येथे १९९ रक्तदात्यांनी केले रक्तदान….!
- एरंडोल प्रतिनिधी – येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्र एरंडोल, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, एरंडोल व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमास युवकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून १९९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.युवक, युवती, महिला व पुरुष तसेच दिव्यांग युवकांनी सुध्दा या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.माजी आमदार चिमणराव पाटील, प्रा.मनोज पाटील, आनंद दाभाडे, डॉ.राहुल पाटील, डॉ.पांडुरंग पिंगळे, डॉ.भानुदास येवलेकर, जळगाव, पुंडलिक पाटील या मान्यवरांनी शिबिरास भेट दिली.
गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र संस्थेचे डॉ.मकरंद वैद्य, डॉ.सुनील पाटील, डॉ.उज्वला पाटील, डॉ.जागृती लोहार, श्रीकांत मुंडणे, विजय कुलकर्णी,उदय सोनवणे यांचे रक्त संकलनासाठी सहकार्य लाभले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा.जी.आर.महाजन,नरेश डागा, प्रसाद दंडवते, मंगेश पाटील, डॉ.एन.डी.पाटील, दिपक पाटील, राजेंद्र पाटील,आर.डी.पाटील,संजय सुर्यवंशी, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
*स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त एरंडोल येथे १९९ रक्तदात्यांनी केले रक्तदान….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm

