- *राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेत दहा मुल्यांचा ठराव संमत…….!*
एरंडोल ( प्रतिनिधी )
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या निमित्ताने संविधान मूल्य जनजागृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्मृतीशेष संगीता भैयासाहेब सोनवणे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात जिल्हास्तरीय 24 व राज्यस्तरीय 17 पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर प्रसंगी संविधान मूल्य जनजागृती संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून राज्यभर संविधान मूल्य प्रचार -प्रसाराचे कार्य करून संविधान साक्षरतेचे काम येणाऱ्या काळात केले जाणार आहे. संविधान मूल्य जनजागृती संघाच्या अध्यक्षपदी एडवोकेट रवींद्र गजरे यांची निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा आगार विभाग प्रमुख पदी शैलेश नन्नवरे यांची निवड करण्यात आली. डॉक्टर संजय भटकर यांची शिक्षक विभाग प्रमुख पदी तसेच रणजीत सोनवणे यांची शिक्षक विभाग कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. चैतन्य नन्नवरे व राजेंद्र वाघ यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
प्रसिद्ध साहित्य प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रात्री संविधान कवी संमेलनाचा बहारदार कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी 27 कवींनी सहभाग नोंदवीला. तुझ्या पावलांचे ठसे पाहिले मी…… दिशा मज कळाली तसा चाललो मी …….या प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांच्या कवितेने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. यात ऍडव्होकेट विजयकुमार कस्तुरे, डाॅ. सुरेंद्र शिंदे, भटू जगदेव, नवनाथ रणखांबे, संगीता साळुंखे, डॉक्टर डी.व्ही. खरात, महामुने प्रवीण महाजन, भीमराव सोनवणे आदी कवींचा समावेश होता.
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमध्ये एकूण दहा ठराव संमत करण्यात आले.
*ठराव*
1. भारत सरकारने भारतीय संविधानाला अधिकृतपणे राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे.
2. भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून शासनाने अधिकृतपणे घोषित करावे.
4. भारतीय संविधानाची मूल्ये रुजविणे, त्यांचे जतन आणि संवर्धन करणे, याकरिता विशेष मोहिम आणि उपक्रम राबविण्यात यावेत.
5. देशातील सर्व माध्यमाच्या शालेय व महाविद्यालयीन सर्व शाखांच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधानाचा अंतर्भाव करण्यात यावा.
6. न्यायालयात संविधान साक्षीने
शपथ देण्यात यावी.
7. भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी कायदेशीर तरतूद करण्यात यावी.
8. संविधान मूल्ये जनजागृती कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान देण्यात यावे.
9. संवैधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमार्फत संविधान विरोधी कृत्य झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
10. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी प्रास्ताविकेचे वाचन अनिवार्य करण्यात यावे.
विविध सत्रांचे सूत्रसंचालन डॉक्टर राहुल निकम, प्राध्यापक नरेंद्र गायकवाड, भैय्यासाहेब सोनवणे, डॉक्टर संदीप कोतकर, राजेंद्र पारे, धनराज अहिरे यांनी यशस्वीरित्या केले. सत्र सहाय्यक म्हणून डॉक्टर बापूराव शिरसाठ, धनराज मोतीराय अण्णा, अश्विनी गोसावी शहादा, पी डी पाटील, लक्ष्मण पाटील, मनोज नन्नवरे, वर्षा शिरसाठ, मेहमूद खाटीक, शहादा यांनी भूमिका पार पाडली.
महिला समिती प्रमुख उषाकिरण खैरनार, अर्थ समिती प्रमुख प्रवीण केदार, प्रसिद्धी विभाग प्रमुख राजेंद्र वाघ, समता शिक्षक परिषद समिती प्रमुख रणजीत सोनवणे, बैठक व्यवस्था समिती प्रमुख सुनील खैरनार, भोजन विभाग प्रमुख भगवान ब्रह्मे, ग्रामीण विभाग प्रमुख सुमनताई बिऱ्हाडे, युवा समिती प्रमुख विनोद रंधे, नोंदणी विभाग प्रमुख चिंतामण जाधव, सहाय्यक शिवदास आप्पा महाजन, कविराज पाटील, संविधान रथ नियोजन प्रमुख चैतन्य नन्नवरे, अर्थ वाहक समिती विविध विभाग प्रमुख प्रमिलाताई ब्रह्मे, उषाताई बाविस्कर, जे.पी. सपकाळे, बाबुराव भगत, बी.बी. शिरसाठ, उज्वला पारेराव, नलिनी संदानशिव, तसेच सर्व तालुक्यातील समन्वय समिती प्रमुख व सर्व समन्वय समिती 160 सदस्य आदींनी आपापल्या विभागाची जबाबदारी सांभाळली. हेमेंद्र सपकाळे, वर्षा अहिरराव यांनी स्मरणिका निर्मितीसाठी विशेष सहकार्य केले. तसेच भैय्यासाहेब सोनवणे यांनी पुरस्कार वितरणासाठी विशेष सहकार्य केले. सुरेश भाऊ सोनवणे, शालिग्राम दादा गायकवाड, मिलिंद भाऊ पवार, प्रा. भरत शिरसाठ यांनी भोजनदानासाठी विशेष सहयोग दिला. जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून संविधान प्रेमी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहकार्य केले. एरंडोल शहर व तालुक्यातील विविध समिती सदस्यांनी भरीव योगदान दिले. वीस सामाजिक संघटनांनी या संविधान सन्मान परिषदेला अनमोल सहकार्य केले.
या प्रकारच्या संविधान सन्मान परिषदा प्रत्येक वर्षी जळगाव जिल्हा भरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जाणार असल्याचे प्रमुख संयोजक भरत शिरसाठ यांनी सांगितले.
*राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेत दहा मुल्यांचा ठराव संमत…….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
