-
*एरंडोल येथे भाजपाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा…….!*

एरंडोल – येथे शासकीय विश्रामगृहावर २७ एप्रिल २०२५ रोजी तालुका भाजपची बैठक नंदू महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होऊन आगामी न.पा., जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसंबधी विचारविनिमय करण्यात आला.यावेळी एरंडोल,विखरण,रिंगणगांव या मंडळ तालुका अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक योगेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, ॲड.किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर व दशरथ महाजन, माजी नगरसेवक सुनील पाटील, अशोक चौधरी,आनंदा चौधरी, निलेश परदेशी,भिका कोळी, ॲड.नितीन महाजन, सचिन विसपुते,अमरजितसिंग पाटील, प्रमोद महाजन, पिंटू राजपूत, ॲड.मधुकर देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उध्दव माळी, गोपाल भंगाळे यांनी कामकाज पाहिले.
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
