एरंडोल महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे स्वागत…..
![]()
- एरंडोल प्रतिनिधी : – आज १३ फेब्रुवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती मिळावी याकरिता चलचित्रपिती रथ येथील डीडीएसपी महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रात 5344 ए मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती मिळाली. महाविद्यालय परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या शिक्षणक्रमासमवेत नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती मिळाली तसेच अनेक विद्यार्थ्यांनी नवीन शिक्षणक्रम विषयी माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य केंदप्रमुख डॉ ए जे पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. एन ए पाटील,केंद्र संयोजक प्रा नितीन व्ही पाटील, केंद्र सहाय्यक विशाल चव्हाण, केंद्र सेवक दिनेश पवार, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
एरंडोल महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे स्वागत……
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*
July 26, 2026
8:15 pm

