Home » संपादकीय » *महाराष्ट्र राज्य स्वयंरोजगार व बेरोजगार सहकारी संघाच्या संचालक मंडळाची लातूर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, विविध विषयांवर चर्चा…………….!*

*महाराष्ट्र राज्य स्वयंरोजगार व बेरोजगार सहकारी संघाच्या संचालक मंडळाची लातूर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, विविध विषयांवर चर्चा…………….!*

  1. *महाराष्ट्र राज्य स्वयंरोजगार व बेरोजगार सहकारी संघाच्या संचालक मंडळाची लातूर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, विविध विषयांवर चर्चा…………….

     

    ​एरंडोल  प्रतिनिधी –
    ​महाराष्ट्र राज्य स्वयंरोजगार व बेरोजगार सहकारी संस्थांचा संघ, मुंबई या संस्थेच्या संचालक मंडळाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक काल, शनिवारी १८ जुलै २०२६ रोजी लातूर येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील बेरोजगार आणि स्वयंरोजगार संस्थांच्या प्रगतीसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
    ​ ​या बैठकीला संचालक मंडळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बहुतांश संचालकांनी आपली उपस्थिती दर्शवली. लातूर येथील या बैठकीत संतोष बाबारावजी बोबडे,सुभाष वैजू देसाई,शेख सिकंदर चांद पाशा पटेल,माणिक मारुती सुकनार,उमाशंकर वैजनाथ माळोदे,सचिन भाऊसाहेब कोल्हापुरे,समीर रामसिंग राजपूत,गणेश गणपत मारुती मोरे,अशोक विठ्ठल माळी,मनीष सुरेशचंद्रजी दवे, तेजस्विनी तानाजी महाजन,रूपाली सचिन दाते,रोहित रमेशचंद्र चुटे,बाबाजी मोरया कुंभार,संजय वसंतराव वानखेडे,सुरेश कांबळे हे संचालक उपस्थित होते.
    ​ ​लातूर येथे झालेल्या या बैठकीत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि स्वयंरोजगार संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. शासकीय कंत्राटांमध्ये बेरोजगार संस्थांना मिळणारे प्राधान्य, नवीन रोजगार संधींची निर्मिती आणि संघाच्या बळकटीकरणासाठी आगामी काळात राबवायची धोरणे यावर सर्वानुमते विचारविनिमय करण्यात आला.
    ​सर्व उपस्थित संचालकांनी संघाच्या प्रगतीसाठी आणि बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या