- *एरंडोल येथे आषाढी एकादशी निमित्त रेवा गुजर समाजातर्फे जल्लोषात समर्थ गोविंद महाराज पालखी सोहळा………!*एरंडोल प्रतिनिधी – येथे रेवा गुजर समाजातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त समर्थ गोविंद महाराज यांची पालखी मिरवणूक २५ जुलै २०२६ रोजी वाजत गाजत जल्लोषात संपूर्ण शहरातून काढण्यात आली.या सोहळ्याला ३७ वर्षांची परंपरा लाभली आहे.पालखीत समर्थ गोविंद महाराज व विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमांची पुजा हेमंत गोपाळ पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पुजा होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली.
जहाँगीर पुरा, बुधवार दरवाजा,मेनरोड मार्गे मिरवणूक जाऊन गुजर समाज मंदिरापर्यंत नेण्यात आली.यावेळी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत होऊन आरती करण्यात आली.तसेच महिला वारकरींनी टाळ मृदंग व विठ्ठल नामाच्या गजरात वाद्यांच्या तालावर ठेका घेतला. विठ्ठल व रुक्मिणीच्या वेशभूषा केलेल्या बालिका मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य होते. गुजर समाजमंदिर परिसरात समर्थ गोविंद महाराजांच्या प्रतिमा व ग्रंथासह विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमांचे पूजन होऊन आरतीने सांगता झाली.
या मिरवणुकीत गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सचिव प्रा.जी.आर.महाजन,प्रा.शरद महाजन, ॲड.नितीन महाजन,प्रा.नितीन पाटील, अरूण पाटील, डॉ.नरेंद्र पाटील, कृष्णा महाजन,गोरख महाजन,शरद पाटील,माधव पाटील,दिनेश महाजन, दिनेश पाटील, सदाशिव पाटील,रामा पाटील, सदानंद पाटील,जंगलू पाटील, अरविंद पाटील,जितू पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,शोभा पाटील, संध्या महाजन आदी मिरवणूकीत सहभागी झाले.सर्वोदय गणेश मंडळ, श्रीराम मंडळ,ओम नमः शिवाय मित्र मंडळ या मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालखी मिरवणूकीच्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Home
»
महाराष्ट्र
»
*एरंडोल येथे आषाढी एकादशी निमित्त रेवा गुजर समाजातर्फे जल्लोषात समर्थ गोविंद महाराज पालखी सोहळा………!*
*एरंडोल येथे आषाढी एकादशी निमित्त रेवा गुजर समाजातर्फे जल्लोषात समर्थ गोविंद महाराज पालखी सोहळा………!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*
July 26, 2026
8:15 pm
