-
*एरंडोल येथील रा ति काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी सौ दिपा श्रीकांत काबरें यांची नेमणूक*
-
एरंडोल प्रतिनिधी – येथील रा ति काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी सौ दिपा श्रीकांत काबरा यांची नेमणूक करण्यात आली या पूर्वी च्या मुख्याध्यापक सौ झंवर मॅडम या नियमाने वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या मुळे हि नेमणूक करण्यात आली. समर्थ शिक्षणाचा वारसा सक्षम पणे पुढे चालवू असे त्यांनी मनोगतात सांगितले .सर्व समाजातील लोकांचे सहकार्य अपेक्षित असून योग्य व्यक्तींचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ. सर्व शासकीय नियमांचे पालन व वरीष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेईन. या नेमणुकीबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला असून सौ दिपा काबरा यांचे अभिनंदन केले संस्थेच्या सर्व पदाधिकारी, व कार्यकारिणी सदस्यांनी निवडीचे स्वागत केले आहे