-
एरंडोल येथे मागील भांडणाच्या कारणावरून चाँपर मारल्याने युवक गंभीर जखमी….
एतंडोल प्रतिनिधी – येथे मागील भांडणाच्या कारणावरून यशवंत उर्फ विकी गोटू पाटील याने प्रसाद पाटील यांच्या पोटावर चाँपरने वार केला त्यात प्रसाद पाटील हा युवक गंभीर जखमी झाला ही घटना 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कैट गल्लीत घडली या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला निहीर लक्ष्मण मराठे यांनी खबर दिल्यावरून 25 डिसेंबर 20 25 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.
यशवंत उर्फ विकी गोटू पाटील गोटू जगन पाटील गजानन भोलेनाथ पाटील यांनी निहीर लक्ष्मण मराठे यांची दुचाकी अडवून तू या गल्लीत का आला असा जाब विचारला त्यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून यशवंत उर्फ विकी याने त्याच्या कमरेला लावलेला चाँपर काढून तो प्रसाद पाटील यांच्या पोटावर वार केला असता तो वार मराठे याने डाव्या हाताने अडवला त्याच्यात त्याच्या डाव्या हाताच्या तळ हातावर दुखापत झाली त्यानंतर त्याने सदर प्रसादच्या पोटात दोनदा चोप खूप सून त्यास गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रसाद हा दुचाकीवरून खाली पडला त्याच वेळी गजानन पाटील याने त्याच्या हातात असलेल्या तलवारीने प्रसादच्या डाव्या पायावर तलवार मारून त्याला गंभीर जखमी केले तसेच आरोपींनी लाकडी दांड्याने मारहाण केली.
प्रसादला गंभीर अवस्थेत महेंद्र रामदास महाजन व गणेश नाना महाजन यांनी एरंडोल येथील कल्पना हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता त्या ठिकाणी डॉक्टर कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगण्यात आले म्हणून प्रसाद यास ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे उपचार अर्थ नेण्यात आले त्या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार होऊन त्याला पुढील उपचारासाठी जळगावला पाठविण्यात आले प्रसाद हा जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील तपास एपीआय रोहिदास गबाले, अनिल पाटील, योगेश महाजन, संदीप पाटील, हे करीत आहेत
