Home » क्राईम » *पद्मालयाच्या जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला ३० वर्षीय महिलेचा मृतदेह, सर्वत्र खळबळ………‌…!*

*पद्मालयाच्या जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला ३० वर्षीय महिलेचा मृतदेह, सर्वत्र खळबळ………‌…!*

  1. *पद्मालयाच्या जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला ३० वर्षीय महिलेचा मृतदेह, सर्वत्र खळबळ………‌…!*

    एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील पद्मालयाच्या जंगलात एका ३० वर्षीय अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह बुधवारी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळून आला.त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.सदर महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह पद्मालयाच्या जंगलात फेकून दिला असावा.असा प्राथमिक अंदाज आहे.याप्रकरणी एरंडोल पो.स्टे ला सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे.
    पद्मालय येथून नागदूलीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जंगलात अर्धवट जळालेला ३० वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला.सदर महिला विवस्र अवस्थेत मिळून आली असून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने सदर महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जाळलेले असावे असा पोलिसांचा कयास आहे.सदर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
    पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव कविता नेरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड या प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.दरम्यान श्वान पथक व फाॅरेन्सिक पथक घटनास्थळी मागवण्यात आले होते.या पथकाने कुठपर्यंत माग दाखवला याबाबत माहिती मिळू शकली नाही.या घटनेबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
    पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व सहाय्यक फौजदार राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या