- *एरंडोलमध्ये ‘ जागतिक ग्राहक दिन ‘ उत्साहात साजरा, सुरक्षित उत्पादने आणि ग्राहक हक्कांवर मान्यवरांचे प्रबोधन……….!*
![]()
एरंडोल प्रतिनिधी – ” सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासू ग्राहक ” या संकल्पनेवर आधारित जागतिक ग्राहक दिन एरंडोल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात १५ मार्च २०२६ रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव अहिरराव हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हा संघटक कैलास महाजन, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील,तालुकाध्यक्षा आरती ठाकूर आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक व आभारप्रदर्शन तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक वैराळकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल महाजन यांनी केले.यावेळी कैलास महाजन,रविंद्र पाटील,शिवाली देशमुख,नुरूद्दीन मुल्लाजी ,आरती ठाकूर यांची समोयोचित भाषणे झाली.
यावेळी प्रसाद दंडवते,जिल्हा उपकार्यवाह कुंदनसिंग ठाकुर पत्रकार पंकज महाजन,पत्रकार प्रवीण महाजन, राजधर महाजन , संजय पाटील,डॉ.राखी काबरा, वंदना कुलकर्णी,संजय पाटील,कमर अली सय्यद, सचिन महाजन,शिवाली देशमुख,वैशाली पाचपोर (पुरवठा निरीक्षक, एरंडोल),ऋषीप्रसाद पोळ व निरज सुरळकर (पुरवठा लिपिक) आदी उपस्थित होते.

