Home » शैक्षणिक » *शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘ युफोरिया 2K26’ चा जल्लोष, सांस्कृतिक आविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध………!* *” ​विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा.” डॉ. विजय शास्त्री यांचे प्रतिपादन………!*

*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘ युफोरिया 2K26’ चा जल्लोष, सांस्कृतिक आविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध………!* *” ​विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा.” डॉ. विजय शास्त्री यांचे प्रतिपादन………!*

  1. ​ *शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘ युफोरिया 2K26’ चा जल्लोष, सांस्कृतिक आविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध………!*
    *” ​विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा.” डॉ. विजय शास्त्री यांचे प्रतिपादन………!*

    ​एरंडोल प्रतिनिधी – येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘ युफोरिया 2K26 ’ हे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच १४ मार्च २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. गायन, नृत्य आणि फॅशन शोच्या बहारदार सादरीकरणामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर चैतन्याने न्हाऊन निघाला होता.​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. विजय शास्त्री होते. यावेळी संस्थेच्या सचिव रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख आणि समन्वयक प्रा. राहुल बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
    ​या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने ‘ स्टुडन्ट ऑफ द इयर ’ पुरस्काराने खालील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले:
    ​पदवी विभाग बी.फार्मसी नाजनीन सय्यद व तुषार साळुंखे.
    ​पदविका विभाग डी फार्मसी आरती पाटील व महेंद्र पाटील.
    ​ ​स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपारिक व आधुनिक नृत्य, समूह नृत्य, भावपूर्ण गायन आणि सामाजिक विषयांवरील नाटिका सादर केल्या.विशेषतः फॅशन शो मधील विद्यार्थ्यांच्या रॅम्प वॉकने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
    ​ ​आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय शास्त्री म्हणाले की, “केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. अशा व्यासपीठामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.”
    सांस्कृतिक सोहळ्यापूर्वी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये १६ माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सध्याच्या विद्यार्थ्यांना करिअर व औद्योगिक क्षेत्रातील संधींबाबत अनमोल मार्गदर्शन केले.
    ​ ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश पाटील, प्रतीक्षा पाटील, प्रियंका सोनवणे व प्रज्ञा पाटील यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. गायत्री सूर्यवंशी, प्रा. योगेश्वरी लोहार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी प्रा. जावेद शेख यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘ युफोरिया 2K26’ चा जल्लोष, सांस्कृतिक आविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध………!* *” ​विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा.” डॉ. विजय शास्त्री यांचे प्रतिपादन………!*