-
*एरंडोल हिंदू नववर्षानिमित्त पांडववाड्यानजीक मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा उत्सव जल्लोषात……….!*
एरंडोल – येथे पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी हिंदू नववर्षानिमित्त पांडववाडा परिसरातील मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.यावेळी हिंदू महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.त्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.
सवाद्य निघालेली ही शोभायात्रा पांडववाड्यापासून निघून भगवा चौक, जिल्हा बॅंक,भोई गल्ली मार्गे जाऊन पांडववाड्यानजीक सांगता झाली.या शोभायात्रेत संस्थेचे अध्यक्ष कुणाल महाजन,भोला पवार, प्रसाद दंडवते,नरेश डागा,मयुर बिर्ला, नितीन बोरसे, प्रकाश पाटील, उमेश साळी, भुषण चौधरी, मुन्ना महाले आदी कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.संध्याकाळी ५ वाजता पांडववाड्यापासून शानदार कलश यात्रा शहरातील विविध भागातून काढण्यात आली.७ दिवस याठिकाणी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.ह.भ.प.विजयकुमार पलोड ( संभाजीनगर) हे कथाकार आहेत.तरी नागरिकांनी ७ दिवस होणाऱ्या भागवत कथेचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
*एरंडोल हिंदू नववर्षानिमित्त पांडववाड्यानजीक मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा उत्सव जल्लोषात……….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
