Home » हेल्थ » *एरंडोलची कन्या समृद्धी पाटीलला राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत ‘ रौप्य पदक ‘,​एरंडोल येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा………!*

*एरंडोलची कन्या समृद्धी पाटीलला राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत ‘ रौप्य पदक ‘,​एरंडोल येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा………!*

  1. *एरंडोलची कन्या समृद्धी पाटीलला राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत ‘ रौप्य पदक ‘,​एरंडोल येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा………!*


    ​एरंडोल – दिल्ली येथे पार पडलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत एरंडोलच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कु. समृद्धी ज्ञानेश्वर पाटील हिने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व क्रीडा संचनालय, महाराष्ट्र राज्य यांनी १६ एप्रिल ते २१ एप्रिल २०२६ दरम्यान दिल्ली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.देशभरातील विविध राज्यांतील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
    ​ ​समृद्धीने क्रीडा शिक्षक मोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव केला होता. अभ्यासाची सांगड घालत तिने चिकाटीने हा टप्पा गाठला आहे. तिच्या या यशाबद्दल एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे,चिटणीस राजीव मणियार, शालेय समिती अध्यक्ष नितीन राठी, सहसचिव धीरज काबरे, संचालक परेश बिर्ला,मुख्याध्यापक हॅरी जॉन व जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षकवृंद व क्रीडा प्रेमींसह इतर मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले.
    ​” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगली तर ते राष्ट्रीय स्तरावर मजल मारू शकतात. हे समृद्धीने सिद्ध केले आहे.”
    — शरदचंद्र काबरे (अध्यक्ष, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ)
    ​ समृद्धीच्या या कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून ग्रामीण भागातील टॅलेंटला आता राष्ट्रीय व्यासपीठ मिळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या