Home » सामाजिक » *सोनबर्डी ग्रामपंचायतीच्या वॉटरमनचा मुलगा झाला पोलीस अधिकारी……….!* *वडिलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवून जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठले.नवनियुक्त पी एस आय अमोल पवार……..‌!*

*सोनबर्डी ग्रामपंचायतीच्या वॉटरमनचा मुलगा झाला पोलीस अधिकारी……….!* *वडिलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवून जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठले.नवनियुक्त पी एस आय अमोल पवार……..‌!*

  1. *सोनबर्डी ग्रामपंचायतीच्या वॉटरमनचा मुलगा झाला पोलीस अधिकारी……….!*

    *वडिलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवून जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठले.नवनियुक्त पी एस आय अमोल पवार……..‌!

    ​एरंडोल प्रतिनिधी  – ” कष्टाला जिद्दीची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते,” हे एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील अमोल शांताराम पवार यांनी सिद्ध केले आहे. एका सामान्य सेवानिवृत्त वॉटरमनच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.​अमोल यांचे वडील शांताराम पवार यांनी ग्रामपंचायतीत ‘ वॉटरमन ‘ म्हणून काम करत गावाची तहान भागवली तर आई-वडिलांनी तुटपुंज्या ३ बिघे शेतीवर मुलांचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असतानाही अमोल यांनी परिस्थितीचे भांडवल न करता संघर्षाचा मार्ग निवडला.जिद्द व अभ्यासाच्या जोरावर अमोल यांनी प्रथम ‘ पोलीस शिपाई ‘ म्हणून खात्यात प्रवेश केला.
    ​ शिपाई पदावर कार्यरत असतानाही मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी जिवंत ठेवले. नोकरीची जबाबदारी सांभाळून दररोज अभ्यासाचे नियोजन केले. नुकत्याच झालेल्या खात्यांतर्गत परीक्षेत यश मिळवून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली आहे.
    ​ ​अमोल यांचे मोठे भाऊ ज्ञानेश्वर पवार हेदेखील ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून सेवा देत आहेत. घरातील दोन मुले सरकारी सेवेत गेल्याने आणि धाकटा मुलगा आता थेट पोलीस अधिकारी बनल्याने पवार कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आहेत.
    ​”वडिलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवून मी अभ्यास केला. आज अधिकारी झाल्याचे समाधान शब्दांत सांगता येणार नाही.”
    — अमोल पवार (नवनियुक्त पी एस आय )
    ​. अमोल पवार यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील आणि कष्टकरी कुटुंबातील तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा ठरला असून संपूर्ण परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या