*एरंडोलच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची ‘ दहावी ‘ त बाजी, ख्याती तोतला विद्यालयात प्रथम………!*
एरंडोल प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या निकालात एरंडोल येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. शाळेने १०० टक्के निकालाची आपली गौरवशाली परंपरा सलग दहाव्या वर्षीही कायम राखली असून, विद्यार्थिनींनी यशाचे शिखर गाठले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले आहे.
विद्यालयातील पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी खालीलप्रमाणे आहेत
प्रथम – ख्याती दीपक तोतला ९२.००%
द्वितीय – आयुषी गणेश सोनार ८८.८०%
तृतीय – स्वरूप स्वप्निल निकुंभ ८८.२०%
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने गेल्या दशकापासून निकालाची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. यावर्षी देखील शाळेचा निकाल १०० टक्के लागल्याने परिसरातून शाळेचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात मुख्याध्यापक हॅरी जॉर्ज जॉन आणि सर्व शिक्षकवृंदाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
”विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. शाळेच्या शिस्तबद्ध वातावरणाचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे हे फळ आहे.”
— मुख्याध्यापक व शिक्षकवृंद
यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे
शरदचंद्रजी काबरे (अध्यक्ष, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ),ॲड. महेश काबरे (उपाध्यक्ष),राजीव मणियार (चिटणीस),धीरज काबरे (सहचिटणीस),डॉ. नितीन राठी (चेअरमन, शालेय समिती), संचालक परेश बिर्ला व प्रवीण झंवर या मान्यवरांनी तसेच शाळेच्या संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

