Home » महाराष्ट्र » *एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!*

*एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!*

  1. *एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!*


    एरंडोल  प्रतिनिधी – येथे बसस्थानकात एस टी बस ये जा करण्यासाठी असुरक्षितता वाढल्याने धरणगांव चौफुली लगतचा समांतर रस्ता अपघात क्षेत्र बनले आहे.गुरूवारी १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बसस्थानकातून जळगांव कडे जाणारी धुळे बुलडाणा बस व धरणगांव चौफुलीकडून येणारी दुचाकी यांचा भीषण अपघात होऊन जवखेडे येथील दुचाकीस्वार विजयसिंग सांडू पाटील वय ५९ वर्षे यांचा नाहक बळी गेला.ही दुर्घटना बसस्थानक व धरणगाव चौफुली दरम्यानच्या समांतर रस्त्यावर घडली.
    याबाबत समजलेली माहिती अशी की धुळे बुलढाणा ही बस एरंडोल बसस्थानकातून जळगांव कडे जाण्यासाठी निघाली असता बस स्थानकापासून जवळपास १५० मीटर अंतरावर बस व दुचाकीच्या अपघाताची घटना घडली.दरम्यान बसचालकाला एरंडोल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तर या अपघाताबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
    राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे पिंप्री फाट्यापासून धरणगांव चौफुली मार्गे बसस्थानक परिसर व कासोदा फाट्यापर्यंत बेशिस्त वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.सदर धुळे बुलडाणा बस ही महामार्ग प्राधिकरणाच्या नवीन वाहतुकीच्या नियमाप्रमाणे उलट दिशेने जात होती की नियमाप्रमाणे जात होती.याबाबत चर्चेला उत आला आहे.एकंदरीत एरंडोल शहरालगत होणारी बेशिस्त रहदारीला लगाम लावणे आवश्यक झाले आहे.अन्यथा यापुढेही निष्पाप लोकांचे बळी जाण्याच्या घटना रोखणे अशक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*पुण्यात ‘ आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा ‘ चा दिमाखदार सोहळा संपन्न,४२ देशांतील १५० हून अधिक कलाकारांच्या सुमारे ३०० व्यंगचित्रांचे प्रदर्शन…………!* *एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा पुण्यात सन्मान,उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते गौरव……….!**

*एरंडोल तालुक्याचा दहावीचा निकाल ८०.२७%, माध्यमिक विद्यालय,फरकांडे आणि लिटिल व्हॅली स्कूल या शाळांचा निकाल १०० टक्के………!* *​तालुक्यातील ३४ शाळांमधून १६१२ विद्यार्थी उत्तीर्ण,शैक्षणिक यशाची परंपरा कायम……….!*