-
*भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला ठार व तीन जण जखमी……….!*
एरंडोल प्रतिनिधी – भरधाव वेगाने जाणाऱ्या पिक अप गाडीने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच गतप्राण झाली.तर दुचाकीचालकासह पिक अप मधील दोन मजूर जखमी झाले.ही दुर्घटना २ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावर नागदुली गावाजवळ घडली.या घटनेची पिकअप चालक भास्कर रामदास गाडेकर ( ३४ वर्षे ,रा.सावरखेडा ता.सोयगांव )याच्या विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिलेली माहिती अशी की भगवान नामदेव पाटील हे त्यांची पत्नी सिंधूबाई भगवान पाटील यांच्या सोबत एम एच ४७ बी एस ८१०२ क्रमांकाच्या दुचाकीने नागदुली शिवारातील शेतातील कामे आटोपून दोघे जण घरी जात असताना मागून एम एच २० जी सी.६१५९ क्रमांकाच्या भरधाव वेगाने येणारी पिक अप बोलेरो गाडीने दुचाकीला मागून धडक दिली.या अपघातात सिंधूबाई भगवान पाटील या जागीच ठार झाल्या.तर भगवान पाटील तसेच पिक अप गाडीमधील कृष्णा शेनपडू गाडेकर व संतोष महादू हाडे हे दोन्ही मजूर जखमी झाले.विशेष म्हणजे पिक अप गाडीचा चालक भास्कर गाडेकर हा अपघाताची खबर न देता तसेच जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.याप्रकरणी एरंडोल पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Home
»
महाराष्ट्र
»
*भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला ठार व तीन जण जखमी……….!*
*भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला ठार व तीन जण जखमी……….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
