Home » महाराष्ट्र » *भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*

*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*

  1. *भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*


  2. एरंडोल प्रतिनिधी – मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे ए.आय. (A.I) प्रणाली निर्मीत मॉर्फ केलेले बनावट फोटो व्हाटसअॅप, फेसबुक, व एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर काही उपद्रवी समाजघटकांकडून प्रसारीत केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन मॉर्फ फोटोंव्दारे एका जबाबदार राजकीय पदाधिकाऱ्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने सदर कृत्य केले जात आहे. मा. गिरीश महाजन हे राज्याचे कॅबीनेट मंत्री असल्याने हे कृत्य राजकीय हेतूने प्रेरीत आहे . म्हणून सदर बदनामी करणाऱ्यांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदर पोस्ट, फोटो प्रसारीत, लाईक व शेअर करणाऱ्या बेजवाबदार व्यंक्तीवर, समाजकंटकांवर आय.टी. अॅक्ट, सायबर क्राईम अॅक्ट नुसार तातडीने गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी म्हणून आज दिनांक 22/06/2026 वार सोमवार रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता एरंडोल पोलीस स्टेशन येथे भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले याप्रसंगी एरंडोल मंडळ अध्यक्ष योगेश युवराज महाजन, सुनील भैया पाटील, एस. आर. पाटील, किशोर निंबाळकर, अमरजितसिंग पाटील, सचिन विसपुते, पिंटू राजपूत, नितीन महाजन, विवेक ठाकूर, दिलीप पांडे, प्रशांत हटकर, नितेश चौधरी, अरुण महाजन, मधुकर देशमुख, सुनील महाजन, दत्तात्रय देशमुख, मोतीलाल पाटील व भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या