Home » सामाजिक » *सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना शालेय साहित्याच्या वाटपासह गौरव…………..!*

*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना शालेय साहित्याच्या वाटपासह गौरव…………..!*

  1. *सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना शालेय साहित्याच्या वाटपासह गौरव…………..!*


    एरंडोल प्रतिनिधी – येथे सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते ५ जुलै २०२६ रोजी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त नायब तहसीलदार सुरेश लक्ष्मण पारखे हे होते.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, नगरसेवक प्रा.मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक आनंद दाभाडे, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र जाधव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.यावेळी २६५ विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
    प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक संस्थाध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांनी केले.कर्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले.आभार प्रदर्शन पी.जी.चौधरी यांनी केले.
    याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप निंबा बडगुजर, शिवाजीराव अहिरराव, वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील, सुरेश देशमुख, भगवान महाजन, गणेश पाटील,जगन महाजन, निंबा कुंभार, सुभाष दर्षे, गुलाबराव पाटील, दिलीप तावडे, वामनराव माळी, भागवत पाटील, पंडीत महाजन, रघुनाथ कोठावदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डि.एस.पाटील, रमेश महाजन, रविंद्र वाघ आदी उपस्थित होते.
    सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्था विविध उपक्रम राबवित असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत आमदार अमोल पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या