-
*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल बस आगाराच्या व्यवस्थापक पदी दिलीप महाजन यांनी पदभार स्वीकारला……………!
एरंडोल प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या येथील बस आगार व्यवस्थापक पदी यावल येथून बदली होऊन आलेले दिलीप महाजन यांनी कामकाजाची सुत्रे स्वीकारली.मावळते आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांच्या कडून महाजन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी नवनियुक्त आगार प्रमुख दिलीप महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दिलीप महाजन यांनी रूजू झाल्यानंतर लगेच आगारातील उपस्थित चालक,वाहक, यांत्रिक व कार्यालयीन कर्मचारी यांची बैठक घेतली.आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून आपल्या आगाराचे उत्पन्न कसे वाढेल, प्रवाशांना दर्जेदार सेवा कशा देता येतील,आगार व बसस्थानक परिसर स्वच्छ व सुंदर कसा राखता येईल.याकडे विशेष लक्ष देण्याचे महाजन यांनी आवाहन केले.व्यसनाधीन कर्मचाऱ्याला वेळप्रसंगी दंड करण्याचे देखील निर्देश देण्यात आले.
दिलीप महाजन हे तालुक्यातील तळई गावाचे रहिवासी असल्याने त्यांच्याकडून प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.ते स्थानिक रहिवासी असल्यामुळे एरंडोल तालुक्याची पुर्ण माहिती त्यांना ज्ञात आहे.विद्यार्थी व प्रवाशांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची ग्वाही दिली.
*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल बस आगाराच्या व्यवस्थापक पदी दिलीप महाजन यांनी पदभार स्वीकारला……………!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
