Home » महाराष्ट्र » *नक्की सुरू आहे तरी काय? शासकीय वेळेत कर्मचारी कार्यालयात सापडेनात.* सरकारी काम अन वाट पाहत थांब…

*नक्की सुरू आहे तरी काय? शासकीय वेळेत कर्मचारी कार्यालयात सापडेनात.* सरकारी काम अन वाट पाहत थांब…

  1. *नक्की सुरू आहे तरी काय? शासकीय वेळेत कर्मचारी कार्यालयात सापडेनात.*
    सरकारी काम अन वाट पाहत थांब…

    एरंडोल प्रतिनिधी – येथील अंजनी मध्यम प्रकल्प उंची वाढी संदर्भात माहिती घेण्यासाठी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील व जिल्हा संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील हे शासकीय वेळेत अंजनी मध्यम प्रकल्पाच्या कार्यालयात भेंट दिली असता फक्त एक कर्मचारी उपस्थित होता,महेंद्रसिंग पाटील हे कार्यालयात पोहचल्यावर त्या कर्मचाऱ्यांने एका दूस-या कर्मचाऱ्यांला भ्रमणध्वनीवर संपर्क करुन बोलाऊन घेतले.
    मात्र येथिल अभियंता व इतर कर्मचाऱ्यांची कार्यालयात दांडी होती,अंजनी प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती या दोन्ही कर्मचाऱ्यांना सांगता आली नाही, याबाबत साहेबच माहिती देतिल असे त्यांनी सांगितले,पण साहेब मात्र कार्यालयीन वेळेत भेटले नाहीत,त्यामुळे पाटील यांनी संताप व्यक्त केला
    कार्यालयीन वेळेत कार्यालयात कर्मचारी आढळून न आल्याने महेंद्रसिंग पाटील यांना सहकारी काम आणि वाट पाहत थांब अशी वेळ ओढवून घ्यावी लागली…
    शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन दिवस विश्रांती मिळत आहे परंतु असे असताना एरंडोल येथील अंजनी मध्यम प्रकल्प कार्यालयात अभियंता कर्मचारी शिपाई हे कार्यालयीन वेळेत कार्यालयात आढळून आले नाही तसेच महेंद्रसिंग पाटील यांनी याबाबत विचारणा केली असता एका उपस्थित व्यक्तीने प्रकल्पाबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले.
    पाटील यांनी हालचाल रजिष्टरमध्ये कर्मचारी अधिका-यांची दैनंदिन कामकाजा संदर्भात नोंद असते,पण ते मागितल्यावर ते देखिल तेथे उपलब्ध नव्हते.
    अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाचा ही वचक नसल्याने ते केंव्हा येतात व जातात याबाबत जनतेला काही ही माहिती नसते,एवढा बेजबदारपणा या महत्वाच्या कार्यलयात असेल तर जनतेची कामे कशी मार्गी लागतील असा संताप यावेळी महेंद्रबापू यांनी व्यक्त केला आहे.
    याबाबत तक्रार वरिष्ठांकडे करणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या