-
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
-
एरंडोल प्रतिनिधी- तालुक्यातील खडके खुर्द येथील रहिवासी गणेश शांताराम पाटील वय वर्ष 32 आणि त्यांचा लहान मुलगा लकी गणेश पाटील वय वर्ष 10 हे खडके खुर्द येथील मित्रांसोबत रेल्वेने जबलपूर येथे स्वानंद कुटी भटपुरा ग्राम पोलीस स्टेशन चेहरगाव तालुका शहापूर जिल्हा जबलपूर येथे नर्मदा नदीच्या दर्शनासाठी गेले असता गणेश पाटील यांच्या मुलगा हा नर्मदा नदीत अंघोळ करण्यासाठी गेला असता त्याला तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना वडिलांच्या निदर्शनास आल्याने त्याच क्षणी वडील गणेश शांताराम पाटील यांनी मुलाला नर्मदा नदीत बुडताना व मदतीसाठी आरडाओरड करताना पाहून मुलाला वाचवण्यासाठी नर्मदा नदीत उडी घेतली असता त्यांना यश आले नाही.पाण्याच्या तीव्र प्रवाहात लकी व गणेश पाटील हे वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी धक्कादायक घटना दिनांक 26/8/2026 रोजी घडली या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील मुलाचा व बापाचा एकाच दिवशी जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात लकी या 10 वर्षीय मुलाचा तर गणेश पाटील वय वर्ष 32 याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, स्थानिक ग्रामस्थांच्या व जबलपूर प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू असून पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहिमेत अडचणी येत असून 27 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी गणेश पाटील यांचा मृतदेह हा तेथील मच्छीमारांना मिळाला मात्र मुलाचा मृतदेह अजून देखील मिळून न आल्याने शोध मोहीम सुरू असून खडके ग्रामस्थांनी देखील जबलपूर गाठून त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे.या घटनेमुळे खडके खुर्द गावावर शोक काळा पसरली असून मुलाने व बापाच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे.पर्यटकांनी पाण्याचा अंदाज आल्याशिवाय अशा धोकादायक ठिकाणी उतरू नये.प्रशासनाने बंदी घातलेल्या किंवा निर्बंध असलेल्या पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे.पाण्याच्या प्रवाहाजवळ उभे राहून सेल्फी काढण्याचा किंवा अतिउत्साह दाखवण्याचा मोह टाळावा.
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
