-
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक,गालापूर येथील दुचाकी स्वाराचा मृत्यू.
एरंडोल प्रतिनिधी : – अज्ञात वाहनाने दुचाकी ला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वार शशिकांत राजेंद्र सूर्यवंशी वय ३८ वर्ष राहणार गालापूर हा गंभीर जखमी होऊन तो बाजूला असलेल्या पाटाच्या चरित साचलेल्या पाण्यात जाऊन पडल्याने पाण्यात बुडून अथवा अपघातात गंभीर जखमी झाल्याने मरण पावला ही घटना २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास एरंडोल गालापूर रस्त्यावर अमोल तिवारी यांच्या शेता नजीक घडली याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गालापूर येथील रहिवासी शशिकांत राजेंद्र सूर्यवंशी हा दुचाकीने एरंडोल कडून गालापूर रस्त्याने घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकी ला धडक दिली या धडकेत सूर्यवंशी हा गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने तो बाजूला असलेल्या चारीत साचलेल्या पाण्यात जाऊन पडला. आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाटील व राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक,गालापूर येथील दुचाकी स्वाराचा मृत्यू.
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm
