-
*एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचा जागर……..!*
*पाणीपोईचा शुभारंभ, रुग्णांना फळवाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप………….!*

एरंडोल प्रतिनिधी – येथे एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एरंडोल शहरात युवा सेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील व नगरसेविका कल्पना मनोज पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘ वाढदिवस सेवाकार्याचा ‘ हा वारसा जपत शहरात राबवण्यात आलेल्या या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
आबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या सोयीसाठी शहरात भव्य पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले.वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रवाशांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.
तसेच, सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना फळवाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वार्ड क्रमांक २ मधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करून आबासाहेबांचा वाढदिवस शैक्षणिक उत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांसाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यात प्रामुख्याने सुनिता रुपेश माळी (उपनगराध्यक्षा, नगरपालिका),रुपेश माळी (जिल्हाप्रमुख, ओबीसी सेल),सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे व छायाताई दाभाडे (शिवसेना),बबलू चौधरी (शिवसेना शहरप्रमुख),कृष्णा ओतारी (युवा सेना शहरप्रमुख),कुणालभाऊ महाजन (माजी उपनगराध्यक्ष),गोपाल श्यामू पाटील(अध्यक्ष, गुजर समाज) यासोबतच नगरसेवक अतुल महाजन, अमोल तंबोली, अनिल महाजन, रवींद्र महाजन, नितेश चौधरी, मयूर महाजन तसेच नगरसेविका सत्यभामा पाटील,पौर्णिमा देवरे, कमल पाटील,भारती गुजर यांची देखील उपस्थिती होती.
या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन प्रा. मनोज पाटील (जिल्हाप्रमुख, युवा सेना तथा गटनेते शिवसेना) आणि कल्पना मनोज पाटील (नगरसेविका, एरंडोल) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परेश बिर्ला, सुनील चौधरी, दीपक पाटील, टिनू ठाकूर, भावेश पाटील, चेतन बडगुजर, भूषण चौधरी, मयूर मराठे, शुभम पाटील, तुषार मराठे यांसह अनेक शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी परिश्रम घेतले.
“आबासाहेबांचे कार्य हे आमच्यासाठी प्रेरणास्थान असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा करणे हेच आमचे कर्तव्य आहे,” अशी भावना यावेळी प्रा. मनोज पाटील यांनी व्यक्त केली.
*एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचा जागर……..!* *पाणीपोईचा शुभारंभ, रुग्णांना फळवाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप………….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*
August 9, 2026
10:19 am
*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा*
July 30, 2026
8:36 pm
