-
*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने हभप किर्तनकारांचा नागरी सत्कार उत्साहात…………!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था व सावित्री फुले शक्तीपीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व दशरथ कुलधरण ( संस्थापक अध्यक्ष) यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात माळी समाजातील हभप किर्तनकारांचा पगडी,शेला, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन नागरी सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रत्येक सत्कारार्थीने संत सावता माळी यांचे अभंग सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अरूणकुमार देवराम माळी हे होते.याप्रसंगी पत्रकार तथा व्यंगचित्रकार शरद महाजन यांच्या व्यंगचित्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,माजी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन,प्रा.एस.बी.महाजन रावेर, प्रभाकर राजाराम चौधरी बऱ्हाणपूर, विजय महाजन,रूपेश माळी, नगरसेविका सुनिता माळी, अनिल महाजन, रविंद्र महाजन, आरती महाजन यांची उपस्थिती होती.
सत्कारार्थींमध्ये हभप भगवान महाराज, शहापूर ता.अमळनेर,हभप बाळकृष्ण महाराज,पिंपळी,ता.अमळनेर,हभप भरत महाराज, पोहरे,ता.चाळीसगांव, हभप सुरेशचंद्र महाराज,पारोळा, हभप प्रल्हाद महाराज, पिंपरखेड ता.भडगांव,हभप सुनील महाराज,विखरण ता.एरंडोल,हभप केशव महाराज, धानोरा ता.चोपडा, पी.जी.चौधरी , एरंडोल यांचा समावेश होता.
याप्रसंगी विजय महाजन, नगरसेवक अनिल महाजन, रविंद्र महाजन, नगरसेविका सुनिताताई माळी, आरती महाजन, घनश्याम महाजन,डि.एस.पाटील, राजेंद्र महाजन, कमलेश चौधरी, शिवाजी महाजन, हेमंत घोंगडे, रमेश महाजन, गोकुळ महाजन, तुकाराम महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक पी.जी.चौधरी यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निंबा बडगुजर यांनी केले तर आभारप्रदर्शन नामदेव पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरूणकुमार माळी, सुरेश देशमुख, गणेश महाजन व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने हभप किर्तनकारांचा नागरी सत्कार उत्साहात…………!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान*
September 8, 2026
8:21 pm
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
