*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम *
एरंडोल, प्रतिनिधी – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आत्मानुभूती भवन, एरंडोल यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मन, बुद्धी आणि भावनांचे संतुलन साधणारी जीवनशैली आहे. योगाच्या नियमित अभ्यासामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते. याच उद्देशाने ब्रह्माकुमारीज् एरंडोल सेवाकेंद्रात हा विशेष योगाभ्यास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात राजयोग ध्यान, योगाभ्यास तसेच निरोगी व आनंदी जीवनासाठी योगाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी, युवक-युवतींनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रह्माकुमारी पुष्पादीदी, संचालिका, ब्रह्माकुमारीज् एरंडोल यांनी केले आहे.
*▪️कार्यक्रम तपशील* :
दिनांक : २१ जून २०२६ , वेळ : सकाळी ६.०० ते ७.००, स्थळ : आत्मानुभूती भवन, एरंडोल
▪️ *नवदशकोत्सव*
ब्रह्माकुमारी संस्थेच्या स्थापनेच्या नव्वद वर्षपूर्ती निमित्त ब्रह्माकुमारी जळगाव सब झोन अंतर्गत नव्वद कार्यक्रम, उपक्रम शृंखले अंतर्गत हा उपक्रम असल्याचे ब्रह्माकुमारी पुष्पादीदी यांनी सांगितले.
– ब्रह्माकुमारीज् आत्मअनुभूती भवन, एरंडोल
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
