-
*एरंडोल तालुक्याचा दहावीचा निकाल ८०.२७%, माध्यमिक विद्यालय,फरकांडे आणि लिटिल व्हॅली स्कूल या शाळांचा निकाल १०० टक्के………!*
*तालुक्यातील ३४ शाळांमधून १६१२ विद्यार्थी उत्तीर्ण,शैक्षणिक यशाची परंपरा कायम……….!*
एरंडोल प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या निकालात एरंडोल तालुक्याने आपल्या शैक्षणिक यशाचा आलेख उंचावत ८०.२७% निकालाची नोंद केली आहे. तालुक्यातील एकूण ३४ शाळांमधून २०१० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १६१२ विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी आर.डी. महाजन यांनी दिली आहे.
यावर्षीच्या निकालात तालुक्यातील दोन शाळांनी घवघवीत यश संपादन करत निकालाची ‘ शंभरी ‘ पूर्ण केली आहे. यात माध्यमिक विद्यालय, फरकांडे आणि लिटल व्हॅली प्री प्रायमरी अँड बालविष्णू हायस्कूल, कासोदा या शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
*तालुक्यातील शाळा निहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.*०१) रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालय, एरंडोल ८२.९७%
०२) जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल ६८.५१%
०३) प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय, जळू ५२.९४%
०४)माध्यमिक विद्यामंदिर, एरंडोल ६७.८५%
०५) अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, एरंडोल ७१.१८%
०६) नॅशनल उर्दू गर्ल्स हायस्कूल, एरंडोल ८४.००%
०७) सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, पिंपळकोठा ७५.२४%
०८) सरस्वती माध्यमिक विद्यालय, विखरण ८४.९३%
९) न्यू इंग्लिश स्कूल, कढोली ७४.४६%
१०) श्रीमती आर. एन. पाटील माध्यमिक विद्यालय, रिंगणगाव ९८.६१%
११) गौरीशंकर माध्यमिक विद्यालय, रवंजे ८२.३५%
१२) साधना माध्यमिक विद्यालय, कासोदा ८६.९५%
१३) सार्वजनिक माध्यमिक विद्यालय, कासोदा ६६.६६%
१४) के. एन. मंत्री कन्या माध्यमिक विद्यालय, कासोदा ६४.१०%
१५) हाजी एन. एम. सय्यद उर्दू हायस्कूल, कासोदा ८२.०८%
१६) एम. डी. पाटील माध्यमिक विद्यालय, खडकेसीम ७२.३४%
१७) डी. के. पाटील माध्यमिक विद्यालय, आडगाव ८८.८८%
१८)जे. एस. जाजू हायस्कूल, उत्राण ६६.६६%
१९)संत हरीहर महाराज माध्यमिक विद्यालय, निपाणे ९१.३०%
२०) तळई माध्यमिक विद्यालय, तळई ८१.५७%
२१)माध्यमिक विद्यालय, भातखेडे ८२.७५%
२२) नवलभाऊ माध्यमिक विद्यालय, ताडे ७३.३३%
२३)सर्वोदय माध्यमिक विद्यालय, खडके बु. ६५.००%
२४) शहजादी उर्दू हायस्कूल, कासोदा ८३.८७%
२५) शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, सोनबर्डी ९३.३३%
२६)हाजी लालमिया देशमुख उर्दू हायस्कूल, उत्राण ७४.१९%
२७) माध्यमिक विद्यालय, भालगाव ९५.१२%
२८) माध्यमिक विद्यालय, जवखेडे सिम ७७.४१%
२९) माध्यमिक विद्यालय, फरकांडे १००.००%
३०) भारती माध्यमिक विद्यालय, कासोदा ८८.१४%
३१) लिटल व्हॅली प्री प्रायमरी अँड बालविष्णू हायस्कूल १००.००%
३२) माध्यमिक विद्यालय, खर्ची बु. ८७.०९%
३३) साई दत्त माध्यमिक विद्यालय, उमरदे ६८.७५%
निकालाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि शाळांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षण विभागाने समाधान व्यक्त केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
