- *एरंडोल येथील रमेश पाटील यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर मिळाली बढती….!*
![]()
एरंडोल – येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल रमेश नथ्थू पाटील यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे.एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी रमेश पाटील यांच्या पोलीस वर्दीवर स्टार लावून सन्मानित केले.रमेश पाटील यांनी पोलीस प्रशासनात ३० वर्षे सेवा झाली असून या आधी महाराष्ट्र पोलीस दल मुंबई येथे २४ वर्षे सेवा केली.२०१९ पासून ते पोलीस मुख्यालय जळगाव येथे नेमणूक असून एरंडोल येथे कार्यरत आहेत.
यावेळी रमेश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.पोलीस सेवेत असताना रमेश पाटील हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असतात.त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*एरंडोल येथील रमेश पाटील यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर मिळाली बढती….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm

