Home » संपादकीय » *एरंडोल येथे अक्षयतृतीयेसाठी मातीच्या घागरी,आंबे,डांगर व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी…………!*

*एरंडोल येथे अक्षयतृतीयेसाठी मातीच्या घागरी,आंबे,डांगर व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी…………!*

  1. *एरंडोल येथे अक्षयतृतीयेसाठी मातीच्या घागरी,आंबे,डांगर व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी…………!*


    एरंडोल प्रतिनिधी – येथे अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी पवित्र मानल्या जाणाऱ्या अशा मुहूर्तावर दुचाकी गाड्या घेण्यासाठी काही ग्राहक विक्रेत्यांकडे दिसून आले.काही नव्या बांधलेल्या घरात गृहप्रवेश करण्यासाठी तयारीला लागले आहेत.तर बांधकामासाठी अक्षयतृतीया हा चांगला मुहूर्त असल्याने काही नागरिक भुखंडावर नवीन बांधकामाचा शुभारंभ करण्याच्या कामाला लागले आहेत.
    एरंडोल येथे बुधवार दरवाजा सह मुख्य रस्त्यावर मातीच्या घागरी,आंबे, टरबूज व डांगर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.तसेच या सणाच्या दिवशी घरोघरी पितरांची व घागरीची पुजा केली जाते.
    दरम्यान सासरी गेलेल्या मुली,भाचे,भाच्या हे आखाजीला मामांकडे येऊन सुटीचा आनंद लुटतात.खानदेशात माहेरी आलेल्या गृहिणी झाडांना बांधलेल्या झोक्यावर बसून ‘ अथानी कैरी तथानी कैरी आंबा झोका खाय वं ‘ अशी गाणी गाऊन आनंद घेतात.
    आंबे,डांगर, टरबूज व घागर यांच्या किमतीत यंदा १० टक्के वाढ झाली आहे.फार पुर्वी अक्षयतृतीयेला नवीन सालदार किंवा जुन्या सालदाराला पुन्हा कामावर घेणे,हा प्रकार आता दुर्मिळ होत चालला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या