- एरंडोल येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या नऊ वाहनांचा रुपये १७ ५६८२७ रकमेत जाहीर लिलाव…एरंडोल;- येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या नऊ वाहनांचा १६ जानेवारी २०२५ रोजी तहसीलदारांच्या दालनात जाहीर लिलाव करण्यात आला. नऊ वाहनांपैकी दोन वाहनधारकांनी लिलावाच्या आधी दंडाची रक्कम भरणा केल्याने त्यांच्या वाहनाचे लिलाव करण्यात आलेले नाही. उर्वरित सात वाहनांचा लिलाव करण्यात आला.
यावेळी १८ लिलावधारकांनी भाग घेतला सात वाहनांमध्ये एक जेसीबी, व सहा ट्रॅक्टर अशा वाहनांचा समावेश होता. सदर वाहनधारक यांच्यावर गौण खनिज दंड म्हणून गुंतलेली दंडाची रक्कम रुपये १६४५७१० होती. वाहन लिलाव तहसीलदार प्रदीप पाटील यांनी संचालन केले.
व त्यांना निवासी नायब तहसीलदार संजय घुले, महसूल सहाय्यक अधिकारी मधुकर नंदनवार, महसूल सहाय्यक राजेंद्र यादनिक यांनी मदत करून लिलाव प्रक्रिया पार पाडली.
एरंडोल येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या नऊ वाहनांचा रुपये १७ ५६८२७ रकमेत जाहीर लिलाव…
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
