-
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*

एरंडोल प्रतिनिधी – येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मुस्तकीम शहा रशीद शहा,वय ३५ वर्षे रा.एरंडोल हा जागीच गतप्राण झाला.ही दुर्घटना शनिवारी २० जून २०२६ रोजी दुपारी टेनीस क्लब परिसरात घडली.अपघात ग्रस्त ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार पुरे भागातील फकीरवाडा येथील रहिवासी मुस्तकीम शहा रशीद शहा हा आपल्या दुचाकीने घराकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार ठोस दिली.त्यात मुस्तकीम शहाचा जागीच मृत्यू झाला.तो मिस्तरीकाम तसेच वाद्य वाजवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत होता.त्याच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm
