Home » महाराष्ट्र » *एरंडोल येथे तुकाराम मुंडे येणार असल्याची अफवा, कारवाईच्या भितीने सकाळपासूनच उपहारगृहे व टपऱ्या बंद………..!*

*एरंडोल येथे तुकाराम मुंडे येणार असल्याची अफवा, कारवाईच्या भितीने सकाळपासूनच उपहारगृहे व टपऱ्या बंद………..!*

  1. *एरंडोल येथे तुकाराम मुंडे येणार असल्याची अफवा, कारवाईच्या भितीने सकाळपासूनच उपहारगृहे व टपऱ्या बंद………..!*

    एरंडोल प्रतिनिधी – ‘ सिंघम ‘ कार्यशैलीमुळे महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचे नांव चर्चेत आले आहे.सोमवारी २२ जून २०२६ रोजी सकाळी मुंडे यांचे पथक धाड टाकणार असल्याची शहरात वाऱ्यासारखी अफवा पसरली.त्यामुळे उपहारगृहे व पानटपऱ्या पटापट बंद झाल्या.सायंकाळी काही दुकाने,टपऱ्या व उपहारगृहे उघडण्यात आली.विशेष करून बसस्थानक परिसरात उपहारगृहे व टपऱ्या बंद असल्याने बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली.एफ डी ए विभागाचे पथक दिवसभर आले नाही व कारवाईही झाली नाही.
    मात्र टपऱ्या व हाॅटेल्स बंद ठेवण्यात आल्याने त्यांच्या रोजीरोटीला आर्थिक फटका बसला.काही पानटऱ्यांवर गुटख्याची व वेगवेगळ्या पानांची विक्री होते.या पानटपरी धारकांची व गुटखा विक्रेत्यांची गाळण उडाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*परंपरेचा वारसा अन् भक्तीचा जल्लोष, एरंडोलमध्ये मरिमाता चौक मित्र मंडळाची भव्य दहीहंडी उत्साहात साजरी………….!* ​ *आमदार ऍड.अमोल पाटील यांच्या हस्ते दहीहंडी व श्रीकृष्णाचे पूजन,शहरात गोविंदांचा अभूतपूर्व उत्साह…………!*