-
*एरंडोल येथे पाणी प्रश्नी नागरिक व संघर्ष समितीतर्फे न.पा.प्रशासनाला निवेदन, किमान ४ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची आग्रही मागणी……….!*
एरंडोल प्रतिनिधी – किमान ४ थ्या दिवशी तरी पाणी पुरवठा करावा.अशी आग्रही मागणी नागरिक व एरंडोल शहर संघर्ष समिती यांनी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी नागरिकांनी सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने ५ ते ६ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठा करण्याऐवजी किमान ३ ते ४ दिवसाआड पाणीपुरवठा करावा याबाबत चर्चा केली.यावेळी नगरपालिकेतर्फे न.पा.प्रशासनाची बाजू मांडण्यात आली.शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर शहराला नियमित व वेळेवर पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी अमोल बागुल यांना नागरिकांच्या वतीने पाणी प्रश्नी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी ॲड.आकाश महाजन, ॲड.प्रकाश बिर्ला, ॲड.डि.डी.पाटील, ॲड.अजिंक्य काळे, ॲड.दिपेश पांडे, ॲड.नयन आरखे, पत्रकार प्रविण महाजन,बी.के.धूत,शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र लाळगे, डॉ.प्रशांत पाटील, प्रसाद दंडवते,विशाल सोनार, दिलीप तावडे, डॉ.पळशीकर, नामदेव पाटील,शेख सांडू, अरूण पाटील आदी नागरिक व महिला उपस्थित होते.
किमान ३ ते ४ दिवसाआड पाणीपुरवठा करावा.सर्व भागात पुरेशा दाबाने व नियमित पाणीपुरवठा व्हावा.प्रत्येक झोनला पाण्याची वेळ ठरवून द्यावी.त्यात बदल झाल्यास नागरिकांना सुचना देण्यात यावी.या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

