Home » सरकारी » *वाळू माफियांना मोठा झटका,एरंडोल तहसील परिसरातच डंपर जप्त, ४.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत……….!*

*वाळू माफियांना मोठा झटका,एरंडोल तहसील परिसरातच डंपर जप्त, ४.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत……….!*

  1. *वाळू माफियांना मोठा झटका,एरंडोल तहसील परिसरातच डंपर जप्त, ४.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत……….!*

    ​एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एरंडोल तहसील कार्यालय परिसरातच महसूल विभाग आणि पोलिसांनी मध्यरात्री संयुक्त सापळा रचून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा एक डंपर रंगेहात पकडला. या कारवाईत एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
    ​ मिळालेल्या माहितीनुसार ​१५ जुलै २०२६ रोजी पहाटे ३.१५ ते सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. गस्तीवर असलेल्या पथकाला तहसील कार्यालय परिसरात संशयास्पद डंपर आढळून आला. तपासणीअंती त्यात विनापरवाना बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
    या कारवाईत ​४ लाख रुपये किंमतीचा टाटा अल्ट्रा एसएलआर एम एच २० जी सी २०८३ क्रमांकाचा डंपर,२० हजार रुपये किंमतीची ४ ब्रास बेकायदेशीर वाळू असा ​एकूण ४ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    ​ ​याप्रकरणी एरंडोलचे ग्रामविकास अधिकारी वैभव श्रीराम पाटील यांनी शासकीय पक्षातर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक इम्रान नबी पठाण रा. अंधारी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२),​महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४८(७) व ४८(८),​खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ या कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
    ​ तालुक्यात अवैध वाळू उपसा, साठा किंवा वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. आगामी काळातही ही मोहीम अशीच तीव्र राहणार असून कठोर कारवाई केली जाईल.
    ​या धडक कारवाईचा पुढील तपास एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या