-
*एरंडोल येथे राष्ट्रीय लोक अदालतीत १३ प्रकरणे निकाली…….!*

एरंडोल प्रतिनिधी – येथे तालुका विधी सेवा समितीतर्फे १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.यात एकूण ९ दाखल पुर्व प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रूपये ६ लाख ३६ हजार रूपयांची तडजोड झाली.तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण १३ प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रूपये ४ लाख १६ हजार ९०० रूपयांची तडजोड झाली.एकूण २२ प्रकरणे निकाली झालेली असून त्यात रक्कम रूपये १० लाख ५२ हजार ९०० रूपयांची तडजोड झाली.
तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश एरंडोल श्रीमती बी.ए.तळेकर यांच्या हस्ते लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले.पंच न्यायाधीश म्हणून विधिज्ञ हिंमतराव पाटील उपस्थित होते.तालुका वकील संघाचे सचिव ॲड.आकाश महाजन, सहसचिव ॲड.प्रेमराज पाटील इतर विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
एरंडोल येथे राष्ट्रीय लोक अदालतीत १३ प्रकरणे निकाली…….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
