- के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजन
![]()
एरंडोल:- यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमती के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक २८ फेब्रुवारी २०२५
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए जे पाटील, डॉक्टर अरविंद बडगुजर, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील,इंग्लिश मीडियम चे प्राचार्य दिनानाथ पाटील, उपप्राचार्य प्रा आर एस पाटील, प्रा डॉक्टर स्वाती शेलार, डॉ सविता पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती.
नर्सरी ते इयत्ता आठवी तील 80 विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरण आणून आपला सहभाग नोंदवला. प्रा. रेवती सोनवणे, प्रा. राजश्री पाटील यांनी विज्ञान परीक्षणाचे काम पाहिले.
विज्ञान प्रदर्शनात प्रत्येक गटत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले. व प्रत्येकाला सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रिया आहेर, भाग्यश्री चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन धनश्री महाजन यांनी केले. विज्ञान प्रदर्शनात विविध वैज्ञानिक अविष्कारांची माहिती जाणून घेण्यासाठी पालकांनी व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीना चिंचोरे, प्रणाली भोसले, ममता सुतार, माधुरी सोनवणे, नूतन पाटील, भिकन वाल्डे, भगवान मराठे, शितल पाटील,नीलप्रभा मेश्रामकर, रूपाली पाटील, रवींद्र चिंचोले, आकाश नेटके, माधुरी महाजन, हर्षल पाटील, आशा शिंपी, यांनी परिश्रम घेतले
के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजन
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm

