-
*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा*
एरंडोल प्रतिनिधी : – येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे सुरू असलेल्या “१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियाना” अंतर्गत एरंडोल सेवाकेंद्र तर्फे अभियान उद्घाटन करून उपस्थित नागरिकांना व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार अमोल बन यांचे हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी तसेच नगरसेवक रविंद्र महाजन यांनी उपस्थितांना संबोधित करत व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी ब्रह्माकुमारीजच्या अभियानाचे कौतुक केले.
कार्यक्रमात पुष्पा दीदी, सविता दीदी, छाया दीदी, श्रीकांत भाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. इंगले सर यांनी नशामुक्ती अभियानाची भूमिका स्पष्ट करत प्रभावी प्रास्ताविक केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता दीदी यांनी केलं.उपस्थित सर्व नागरिकांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली.
यावेळी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व तसेच व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला साहेबराव भाई, गजानन पाटील, सुभाष भाई, शांताराम भाई तसेच मोठ्या संख्येने माता-भगिनी व नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी समाजात व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. ब्रह्माकुमारीजतर्फे राबविण्यात येत असलेल्या १० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त भारताच्या संकल्पाला पाठिंबा दर्शविला.
Home
»
महाराष्ट्र
»
*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा*
*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
