Home » सामाजिक » *महामानव तथा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शानदार मोटरसायकल रॅली, जयघोष व भव्य मिरवणूकीने एरंडोल दणाणले…….!*

*महामानव तथा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शानदार मोटरसायकल रॅली, जयघोष व भव्य मिरवणूकीने एरंडोल दणाणले…….!*

  1. *महामानव तथा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शानदार मोटरसायकल रॅली, जयघोष व भव्य मिरवणूकीने एरंडोल दणाणले…….!*


    एरंडोल प्रतिनिधी – येथे मंगळवारी १४ एप्रिल २०२६ रोजी आमदार अमोल चिमणराव पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनिता माळी, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, भाजपाचे संघटन मंत्री ॲड.किशोर काळकर, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,सामाजिक कार्यकर्ते शालिग्राम गायकवाड, गटनेते प्रा. मनोज पाटील,आनंद दाभाडे, वीजवितरणचे उपविभागीय अधिकारी रामपाल गेडाम, नगरसेवक अमोल तंबोली यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.माल्यार्पणाच्या कार्यक्रमानंतर सकाळी युवा कार्यकर्त्यांनी शहरातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत अप्रतिम मोटारसायकल रॅली काढली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.त्यामुळे शहर दणाणून गेले.
    संध्याकाळी शहरातून वाजत गाजत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी सामाजिक सदभावनेचे दर्शन घडले.ठिकठिकाणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच वाद्यांच्या तालावर युवा कार्यकर्ते थीरकत होते.एकंदरीत या मिरवणुक प्रसंगी शहरवासीयांच्या उत्साहाला उधाण आले.
    माल्यार्पण प्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,खडके सिम हायस्कूलचे चेअरमन जगदीश पाटील, ॲड.ओम त्रिवेदी, राजेश पाटील, बाळासाहेब पाटील,पी.जी.पाटील, डॉ.संग्राम पाटील, डॉ.बाबा बोहरी, किशोर निंबाळकर, सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लखन बनसोडे, उपाध्यक्ष प्रवीण बागुल,मयुर अहिरे, प्रविण बाविस्कर, समितीचे कोषाध्यक्ष संघरत्न गायकवाड,मोहन सैंदाणे, सुरेश सोनवणे, अनील पाटील,प्रा.भरत शिरसाठ,प्रा.संदीप कोतकर, डॉ.अतुल सोनवणे, रणजित मोरे, भैय्या अहिरे, मनोहर बोडरे,रवि बोरसे,प्रा.नरेंद्र गायकवाड व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या