-
वही गायन लोककलेच्या संवर्धनासाठी लोककला भवन निर्माण व्हावे..!!
शाहीर विनोद ढगे यांना अपेक्षा….!एरंडोल येथे वही गायन लोक कलावंत संवाद यात्रा उत्साहात संपन्न
एंरडोल प्रतिनिधी :-खानदेशातील लोकसंस्कृती व परंपरेतील अविभाज्य अशी लोककला म्हणजे वहीगायन परंतु काळ ओघात लुप्त होत चाललेल्या या लोककलेच्या संवर्धनासाठी राजाश्रय सोबतच लोकश्रया ची गरज असून ह्या लोककलेच्या संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन खान्देश वही गायन लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांनी केले
खानदेश लोक कलावंत विकास परिषदेच्या वतीने एरंडोल तालुकास्तरीय वही गायन लोककलावंत संवाद यात्रेचे व तालुकास्तरीय लोक कलावंत मेळाव्याचे आयोजन एरंडोल येथील मरी माता मंदिर चौकात करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून शाहीर विनोद ढगे यांनी आपले विचार मांडले
राज्य शासनाच्या वतीने वहीगायन लोककलेला खानदेशातील लोककला म्हणून नुकतीच राज्य मान्यता मिळाली असून राज्य शासनाच्या वतीने शासन स्तरावरचे वही गायन महोत्सव व या लोककलेत कार्यरत लोककलावंतांसाठी राज्य पुरस्कार सुरू केले आहे तथा स्थानिक स्तरावर या लोककलावंतांच्या विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेऊन लोककलावंतांसाठी लोककलाभवन निर्माण व्हावे अशी इच्छा याप्रसंगी श्री ढगे यांनी व्यक्त केली
प्रारंभी नागोबा मढी पासून कानबाई मातेच्या प्रतिमाची सजविलेल्या रथातून व कानबाई मातेचा जयघोष करत लोककलावंताच्या संवाद यात्रेत प्रारंभ झाला वही गायन लोककलावंतांनी आपले पारंपारिक वाद्य व वेशभूषा सह मरीमाता मंदिरापर्यंत ही संवाद यात्रा काढण्यात आली यात पारंपारिक वही गायनाचे लोककलावंतांनी सादरीकरण केले या संवाद यात्रेचा समारोप व तालुका मेळाव्याचा शुभारंभ मरीमाता मंदिर चौक या ठिकाणी करण्यात आले याप्रसंगी एरंडोल नगरीचे नगरसेवक सौ छायाताई दाभाडे आनंद दाभाडे श्री दीपक पाटील नितेश चौधरी डॉ नरेंद्र पाटील गोपालदादा पाटील गणेश मराठे आदि मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत खानदेश वही गायन परिषदेचे तालुकाप्रमुख चिंतामण चौधरी यांनी केले
या संवाद यात्रेत एरंडोल तालुक्यातील मोठ्या संख्येने वहीमंडळे सहभागी झाली होतीकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार सोनार,नाना पाटील, सावता माळी, भगवान बडगुजर, तसेच कानबाई मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.


