Home » महाराष्ट्र » *सावदे प्रचा. परिसरात अवैध वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल पथकाने पकडले डम्पर………….!*

*सावदे प्रचा. परिसरात अवैध वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल पथकाने पकडले डम्पर………….!*

  • *सावदे प्रचा. परिसरात अवैध वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल पथकाने पकडले डम्पर………….!*

    एरंडोल प्रतिनिधी – मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथील महसूल पथकाने सावदे प्रचा.रिंगणगांव रस्त्यावर विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा डम्पर रंगेहाथ पकडला.या कारवाईत हायवा डम्पर व ३ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
    तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी विरेंद्र पालवे, श्रीकांत कासुंदे, रविराज पाटील, संदीप पाटील, सुदर्शन पवार, वैभव पाठे, आकाश बनकर यांच्या पथकाने सदर कारवाई केली.या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी रिंगणगांव सागर कोळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
    अय्युब रफिक पटेल वय २६ वर्षे असे डम्पर चालकाचे नाव आहे.याप्रकरणी एरंडोल पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या