-
*दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एरंडोलमध्ये ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण संपन्न……….!*
एरंडोल – शिक्षण विभाग, पंचायत समिती व गटसाधन केंद्र यांच्या वतीने येथील के. डी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये १७ व १८ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.या शिबिरात तालुक्यातील पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सक्रिय सहभाग घेतला.शिबिराचा प्रमुख उद्देश दिव्यांग हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि समाजात याविषयी जागरूकता निर्माण करणे असून ती काळाची गरज आहे हे स्पष्ट करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शक वैशाली पाटील, मनिषा पाटील, वर्षा पवार आणि संदीप महाजन यांनी सुलभक म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या व शासकीय योजनांवर सविस्तर प्रकाश टाकला.
समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी स्पष्ट केले की,” संवेदनशीलता ही काळाची गरज असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे केवळ कर्तव्य म्हणून न पाहता संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे प्रत्यक्ष कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल.”
यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, प्राचार्य दिनानाथ पाटील, भाईदास पाटील, नितीन पाटील, हिम्मत मोरे, सतिश चव्हाण, सुनील महाजन, राजेंद्र मोरे, अब्दुल रज्जाक, चंद्रकांत पाटील, युवराज पाटील, विजय बडगुजर,दत्तू पवार, भालेराव यांच्यासह विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख आणि विशेष शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तुषार वडगावकर यांनी केले तर आभार युवराज पाटील यांनी मानले. या उपक्रमामुळे तालुक्यातील दिव्यांग शिक्षण चळवळीला नवचैतन्य मिळाले आहे.
