- *एरंडोल येथे सुवर्णकार समाज सभागृहाचे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते थाटात लोकार्पण……………!*
- *सामाजिक कार्यक्रमाचे व जनजागृतीचे सातत्य ठेवावे – आमदार ॲड.अमोल पाटील……………!*
-
एरंडोल प्रतिनिधी – येथील अहिर सुवर्णकार समाजातर्फे श्री संत नरहरी महाराज यांच्या ८३३ व्या जयंतीचे औचित्य साधून नवनिर्मित सुवर्णकार समाज भव्य सभागृहाचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार ॲड.अमोल चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या संकल्पनेतून व आमदार निधीतील ४० लाख रुपयांच्या तरतुदीतून हे भव्य सामाजिक सभागृह उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना एरंडोलचे गटनेते प्रा.मनोज पाटील यांच्या हस्ते संतश्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तर नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आमदार अमोल पाटील यांनी हे सभागृह अहिर सुवर्णकार समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगतीचे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला. केवळ सोहळ्यांपुरता वापर न करता येथे जन जागृतीचे उपक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सुवर्णकार समाज मंडळाच्या वतीने आमदार ॲड.अमोल पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, गटनेते मनोज पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी, मुख्याधिकारी अमोल बागुल, जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, माजी नगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड,आनंद दाभाडे,प्रवीण महाजन या मान्यवरांसह नगरसेविका कमलबाई पाटील,छाया दाभाडे, पौर्णिमा देवरे,भारती गुजर, शारदा मराठे,आरती महाजन यांच्या सह महिला लोकप्रतिनिधींचा विशेष गौरव करण्यात आला.या सोहळ्यास सुवर्णकार समाज मंडळाचे अध्यक्ष जगदीश मोरे, उपाध्यक्ष विकास पिंगळे, खजिनदार लोकेश बाविस्कर, जगदीश लोटन मोरे, गणेश दाभाडे, उद्योगपती विजय जाधव, सचिन वानखेडे, विवेक मोरे, महेश देवरे, विशाल सोनार,अजय वाघ,माजी नगराध्यक्षा रत्ना दगडू देवरे, नगरसेविका पौर्णिमा देवरे,रत्ना विजय मोरे, रत्ना अरूण वानखेडे, सुनिता अशोक मोरे आदी समाज मंडळाचे मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक ग्रामीण उन्नती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन विसपुते यांनी केले. विजय भामरे यांनी सूत्रसंचालन केले, तर अंजुषा सचिन विसपुते यांनी आभार मानले. या प्रसंगी सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
